Friday, September 30, 2016

मेरा कुछ सामान....

आजच्या गाण्या बद्दल माझ्या साठी खूप च अवघड आहे. कारण  या गाण्या बद्दल किती अन काय लिहू असं मला झालंय. ह्या गाण्यात मला संगीत विश्वामधली आवडणारी तमाम माणसं आहेत. हे गाणं साऱ्या देव माणसांनी तयार केलंय असं जर मी म्हणलं तर ती अतिशयोक्ती नाही होणार. शब्द गुलजार साहेब, संगीत आर डी बर्मन आणि स्वर माझ्या आशा ताईंचे खल्लास अजून काय हवंय ??? मी पहिला फोन घेतला होता तेव्हा पासून हे गाणं माझ्या फोन मध्ये आहे आणि मी ते असं कधीही ऐकत नाही. हे गाणं ऐकायचा असा एक माहोल असतो तेव्हाच हे गाणं ऐकतो. जस आपण आजीच्या हातचा साखरांबा रोज न खाता कसं स्पेशली खातो तसंच या गाण्याचं आहे. खूप हेक्टिक दिवसा नंतर हे गाणं ऐकलं की आहाह सुख. so this is my stress buster सुकून वाला song.  ज्याचे शब्द, चाल , आवाज सगळचं दर्जा आहे. म्हणजे गुलजार हे कस लिहू शकतात हे मला अजून झेपलं नाहीये ११६ चाँद की राते एक तुम्हारे कँधे का तील... म्हणजे अहो काका असं नसत कुठे. पण त्यामुळेच मला हे गाणं अधिक आवडत कधी काय surprise मिळेल you never know. So ज्यादा  सोचो मत just enjoy. तुमचं stress buster गाणं कोणतं आहे हे मला नक्की सांगा. आणि हो तुमच्या प्रतिक्रिया, criticisms आणि  suggestions ही.
till then keep smiling and जियो दिलसे
 https://www.youtube.com/watch?v=OlvXDGJAMT0

Monday, September 26, 2016

दिल चाहता हैं

दिल चाहता हैं
दिल चाहता है च title ट्रॅक. एक असं गाणं जे माझ्या आजवर च्या साऱ्या मोबाईल मध्ये सतत carry forward होत आलंय आणि तोवर carry forward होत राहील जोवर आम्ही सगळे जण गोवा ला जाऊन नाही येत. माझ्या साठी हे गाणं त्या प्लॅन चा प्रतीक आहे जो प्रत्येक वर्षी किमान १०-१२ वेळा ठरतो आणि जस्ट बिकॉज सगळे जणांच्या वेळा बसत नाहित म्हणून कॅन्सल ही होतो. आजही मोबाईल ची गाणी स्क्रोल करताना हे गाणं लागलं की क्षणाचा ही विलंब न करता मी ते गाणं स्किप करतो पण डिलीट मात्र करत नाही कारण कुठे तरी वाटतं हे गाणं डिलीट केलं की आम्हा मित्रांचं मिळून जे स्वप्न आहे त्याची आशा कुठे तरी संपायला नको. मैत्री ची मजाच भारी असते ना राव. लेह लद्दाख असो वा गोवा दरवर्षी एकत्र जाण्याचे प्लॅन करण हा जणू काही mandatory नियमच आहे असं म्हणलं तरी गैर नाही होणार. सो हे गाणं माझ्या मोबाईल मधून कधीच डिलीट होणार नाही. तुमच्या प्ले लिस्ट मधलं असं कोणतं गाणं आहे जे तुमच्या फ्रेंड्स च्या प्लॅन ची आठवण करून देत आम्हाला नक्की सांगा. 

Saturday, June 18, 2016

हे ब्लॉग्स rather यांना ब्लॉग्स म्हणता येईल की नाही या बद्दल च मला खात्री नव्हती.  म्हणून बरच मनात साचलं होत काही शब्दांत ही उतरवलं होत पण ते तुमच्या समोर मांडायची हिम्मत होत नव्हती. पण आज शेवटी धीर करून ही नवीन ब्लॉग चेन सूरु करत आहे. बऱ्याच जणांना हा ब्लॉग न वाटता फेसबुक स्टेटस अपडेट्स वाटतील पण भावना अश्याच असतात कधी कधी ४ शब्दांत आयुष्य मांडतात. अन कधी कधी आयुष्यभर शब्द दवडले जातात पण नक्की भावना समोर येत नाही. तेव्हा कधी भरभरून असेल,तर कधी चारोळी असेल पण जे काही असेल ते मनापासून असेल. आणि मला खात्री आहे you will love it. तर विषय काय ?

आपल्याला अनेक गाणी अनेक क्षणी हवी हवीशी आपलीशी वाटतात. सकाळी automatically हात high energy songs कडे जातो दिवस कलता कलता लता आशा , किशोरदांचे सूर दिवसभराचा भार हलका करतात. पण आपल्या प्ले लिस्ट मध्ये  अशी काही गाणी असतात जी अनेकदा आपण स्किप करतो पण कधीच डिलीट मात्र करत नाही. मला खात्री आहे तुमच्याही प्ले लिस्ट मध्ये अशी अनेक गाणी असतील जी तुम्ही ठराविक situation, moment  ला ऐकता आणि तो क्षण चिरतरुण होऊन जातो  ( not necessary sad or breakup songs )
आणि अशी गाणी तुमच्या प्ले लिस्ट मधून कधीच जात नाहीत. कारण ती गाणी फक्त गाणी नसतात त्या असतात आठवणी आणि त्या कश्या डिलीट होतील. ही गाणी अत्तरा सारखी असतात ज्याचा एक थेम्ब ही दिवस सुगंधित करतात. चला अश्याच माझ्या प्ले लिस्ट मधल्या गाण्याबद्दल गप्पा मारू through this brand new ब्लॉग चेन " A song we may skip but never delete " आणि हो तुमच्या कडे ही अशी गाणी असतील तर त्याच्या आठवणी प्लीज शेअर करा.